मराठा सेवा संघ शिवधर्म दिनदर्शिका २०२३ चे लोहारा शहरात प्रकाशन

लोहारा ( जि.उस्मानाबाद ) : लोहारा शहरात मराठा सेवा संघ शिवधर्म दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन बुधवारी ११ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आले.
यावेळी कॉग्रेसचे शहरध्यक्ष आनोद्दीन सावर, लोहारा ग्रा.पं.माजी सदस्य महेबुब गवंडी,पञकार निलकंठ कांबळे, शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख सलीम शेख, शिवधर्म प्रचारक प्रकाश भगत, रौफ बागवान,पोलीस पाटील, तानाजी माटे, महेबुब पठाण आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

                  प्रबोधनाचा ज्वालामुखी

                    केशव सिताराम ठाकरे

                      जन्म १७ सप्टेंबर १८८५
                      मृत्यु २० नोव्हेंब १९७३

महाराष्ट्रातील प्रबोधनाचा ज्वालामुखी म्हणजे केशव सिताराम ठाकरे आहेत, आपल्या वाणी, लेखणी व कार्याने त्यांनी बहुजन समाजात ज्ञानाचा अंगार चेतविला, सत्य आणि त्यासाठी लागणारा निर्भीड कणा ही प्रबोधनकारांची ओळख होती. वैदिक ब्राम्हणी व्यवस्थेविरोधात त्यांनी अविरत संघर्ष केला. पुरोहीतशाही, भांडवलशाही, शोषण, गुलामगीरीवर आपल्या तेजस्वी लेखणीतून प्रहार केला. ब्राम्हणी लेखणीला गतप्राण करणारा महानायक म्हणजे प्रबोधनकार ठाकरे आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली जगणाऱ्या बहुजनात दिशाभूल करणाऱ्या पोटार्थी, स्वार्थी, पुरोहितांना त्यांनी खरे हिंदुत्व सांगुन उघडे पाडले. माझ हिदुत्व हे पळीपंचपात्र किंवा शेंडी जाणव्याच नाही हे चणकावून सांगणार प्रबोधनकार म्हणजे संत तुकारामांच्या शब्दात धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडण’ या चाण्याचे वारकरीच होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!