धडक मोर्चासाठी कोतवाल नागपूरला रवाना

उमरगा/प्रतिनिधी

कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा या व अन्य मागण्यासाठी उमरगा कोतवाल संघटना धडक मोर्चासाठी नागपूरला मंगळवारी संध्याकाळी रवाना झाले आहेत.

कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा तसेच भेदभाव दूर करून समान काम समान वेतन प्रमाणे सरसकट पंधरा हजार रुपये वेतन द्या त्याचप्रमाणे तलाठी महसूल सहाय्यक व तत्सम पदासाठी 50 टक्के आरक्षण देण्यात यावे शिपाई पदाच्या सर्व रिक्त जागा कोतवाल मधूनच भरण्यात यावा मयत झालेल्या कोतवालांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत समावून घ्यावे. सेवानिवृत्त झाल्यानंतर कोतवालास दहा लाख रुपये रक्कम निर्वाहभत्ता व राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात यावी असे कोतवाल संघटनेचे उमरगा तालुका अध्यक्ष शिवशंकर मंडले, उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, सचिव दिगंबर चव्हाण यांनी सांगितले.

 

HTML img Tag Simply Easy Learning

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!