चौदा मतदाराने जागेवर मतदानाचा हक्क बजावला

जेवळी, ( ता.लोहारा ) सुधीर कोरे

भारतीय निवडणूक आयोगाने प्रथमच अपंग व्यक्तींना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ जेवळी (ता. लोहारा) येथील मतदाराने घेतले असून गुरुवारी (ता.२) येथील चौदा अपंग मतदारांपैकी चौदा मतदाराने जागेवर मतदानाचा हक्क बजावला आहे

वाढत्या वयामुळे तसेच शारीरिक व्यंग असल्यामुळे अनेक नागरिक मतदान करण्यासाठी केंद्रापर्यंत पोहोचू शकत नव्हते त्यामुळे मतदानाची टक्क्यावारी घसरते मतदानाचे टक्केवारी वाढावे अधिकाधिक नागरिकांना मतदान करण्याचा हक्क बजावता यावा या दृष्टे भारतीय निवडणूक आयोगाने प्रथमच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षावरील वृद्ध आणि ४० टक्क्याहून अधिक अपंग व्यक्तींना घरबसल्या मतदान करण्यास संधी उपलब्ध करून दिले आहे मतदारासाठी ही सुविधा ३० एप्रिल ते ४ मे या दरम्यान राबविली जात आहे.

या सुविधेचा लाभ जेवळी येथील मतदाराने घेतले आहे. गुरुवारी (ता.२) येथील सुशीला कल्याणप्पा सोळशे, जंगलाबाई बाबाराव पाटील,
गुंडाप्पा कल्लाप्पा तोरकडे, लक्ष्मी रावसाहेब बिराजदार, राजश्री सत्तेश्वर भिसे, विनायक गणपती कांबळे, कमळाबाई मैल्लारी कारभारी, मैना बाबुशिंग राजपूत, फातिमा महताब मुजावर, बसवराज यल्लाप्पा दंडगुले, शेषाबाई धोंडिबा साळुंके, शांताबाई लिंबनाप्पा कारभारी, गंगाबाई संभाजी भोरे व हिरामण भिकू जाधव या चौदा मतदारांपैकी चौदा मतदाराने आपला हक्क बजावला आहे. याप्रसंगी मतदान प्रक्रिया पारदर्शक, गुप्त पद्धतीने होण्याबाबत सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आले होत. या वेळी झोनल अधिकारी एस एस तारळकर, मायक्रो ऑबझरवर ओ. आर. पाटील, एन. बी. घोडके, बीट अंमलदार कांतू राठोड, बी. तलाठी हणमंत जमादार एल. ओ. एस. डी. मारुंबळे, सुधीर येणेगुरे, दिलीप चौगुले, एस एच गाडेकर, बी एस माळी, ए एस सर्जे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!