धाराशिव

घरकुल योजनेतील वंचित लाभार्थ्यांसाठी ग्रामसभा घेण्याची मागणी

लोहारा खुर्दसह तालुक्यातील ४७ गावांतील ग्रामपंचायतींना लेखी आदेश द्या; सामाजिक संस्थेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

लोहारा (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नवीन घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीतून वंचित राहिलेल्या पात्र गरजू नागरिकांना न्याय मिळावा, यासाठी लोहारा खुर्दसह लोहारा तालुक्यातील ४७ गावांमध्ये ग्रामसभा घेण्याचे आदेश ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी कै. गयाबाई रावसाहेब पाटील बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात संस्थेने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ओमकार गायकवाड यांना ३० ऑक्टोबर रोजी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नवीन घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार करताना अनेक पात्र व गरजू नागरिक वंचित राहण्याची शक्यता आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामसभा हे महत्त्वाचे माध्यम आहे. मात्र, काही ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ होत असल्याने पात्र लाभार्थ्यांना योजनांची माहिती व लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!