माकणी निम्न तेरणा प्रकल्पाचे सर्वच दरवाजे उघडले

 

HTML img Tag Simply Easy Learning

लोहारा (जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला असल्यामुळे येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज बुधवारी दि. 25/09/2024 रोजी पहाटे ठीक 5.15 वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे द्वार क्रं 5,10,4,11,3, 12,2 व 13 हे 10 सेंटिमीटर ने वाढवून तेरणा नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे. सद्यःस्थितीत द्वार क्रं 1 ते 14 (एकूण 14) ही वक्रद्वारे 20 सेंटिमीटर ने चालू असून एकूण 10704 क्यूसेक्स (303.10 क्यूमेक्स) इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल. तरी, नदी काठावरील / पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.

पुरनियंत्रण कक्ष निम्न तेरणा प्रकल्प माकणी

Related Articles

One Comment

  1. साहेब शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याचं काय नदीकाठच्या शेतकऱ्याचं साहेब खूप नुकसान होत आहे तरी तुम्ही 75 टक्के पाणी भरल्यास
    पाणी का खाली सोडत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!