पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर इयत्ता 9 वी व 11 वी प्रवेशासाठी तारीख जाहीर

पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर इयत्ता 9 वी व 11 वी प्रवेशासाठी येत्या 10 फेब्रुवारीला,शनिवार नवोदय विद्यालय मधे प्रवेशपरीक्षा इयत्ता नववी व अकरावी साठी एकुण 398 विधार्थी प्रवेशपरीक्षा देणार.
इयत्ता नववी व अकरावीसाठी काही जागा रिक्त असल्याने त्या भरण्यासाठीची लेखीपरीक्षा 10 फेब्रुवारी 2024 शनिवार ,रोजी होणार आहे. हया परीक्षा करिता इयत्ता नववी परीक्षा केंद्र जवाहर नवोदय विद्यालय, तुलजापुर, शैक्षिक ईमारत, असेल व केंद्र अधीक्षक श्रीनिवास आर. गज्जम यांच्या निरीक्षण खाली परीक्षा होणार आहे आणि इयत्ता अकरावीसाठी (एकूण विद्यार्थी परीक्षा देणारे विद्यार्थी 83) परीक्षा केंद्र : नवोदय विद्यालय, मुलींची मेस ( भोजनालय ) असेल व केंद्र अधीक्षक श्री चक्रपाणि एस.गोमारे यांच्या निरीक्षण खाली अकरावी प्रवेश परीक्षा होणार आहे.

ही लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. विद्यार्थ्यानी त्यांच्या प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता उपस्थित रहावे .

ही प्रवेश परीक्षा लेखी स्वरूपाची असून ज्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत त्यांचे प्रवेशपत्र www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून परीक्षेवेळी या प्रवेश पत्राची प्रिंट घेऊन येणे आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी प्रवेश पत्रावर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक पाहाव्यात. या बाबत अधिक माहितीसाठी प्रवेश परीक्षा प्रभारी श्री एस. आर. गज्जम (9921730357) किंवा श्री. डी. एस. उस्तुर्गे (8796815999) यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय तुलजापुर चे प्राचार्य श्री. गंगाराम सिंह यांनी केले आहे.

Related Articles

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!