क्राईम

लोहारा (खुर्द) मधील तरुणाच्या हत्येप्रकरणी गावठी कट्टा पुरवणारा आरोपी अटकेत

लोहारा : लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे सहा फेब्रुवारीमध्ये एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुख्य आरोपी रावण रसाळ याने हत्या करण्यासाठी वापरलेल्या गावठी कट्ट्याचा शोध लोहारा पोलिसांना लावला असून गावठी कट्टा पुरविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अहिल्यानगर जिल्ह्यातून अटक केली आहे.

लोहारा पोलिसांनी आरोपीस तत्काळ गुन्हा दाखल करून रावण रसाळला अटक केली होती. त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. चौकशीदरम्यान आरोपी रावण रसाळ यांने सचिन नंदूू काळे (वय ३० रा. शिवपुजी ता. गंगापूर जि. संभाजीनगर) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे याच्या शोधासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले. निरंजन फुलमाळी, आकाश भोसले, सुनील मोरे यांच्या पथकाने पाळत ठेऊन २७ फेब्रुवारीला रात्री अकरा वाजता नेवासा ( जि.अहिल्यानगर) येथून गावठी कट्टा विकणारा सचिन नंदू काळे याला अटक केली. शनिवारीपर्यंत (ता. एक) पोलिस कोठडी मिळाली होती.

लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील आरोपी रावण रसाळ आणि त्याची सावत्र बहीण यांच्यात काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. या प्रकरणात गावातीलच नितीन आरगडे (वय २८) साक्षीदार होता. त्यामुळे रावणच्या मनात त्याच्याविषयी राग होता. याच रागातून ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता रावण रसाळ नितीनच्या शोधात त्याच्या शेतात पोहोचला. त्यावेळी नितीन व शेतमजूर राम रसाळ हे तळ्यातील पाण्यात विद्युतपंप बसवत होते.

रावण तिथे पोहोचताच त्याने नितीनवर गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी छातीजवळ तर दुसरी तोंडाजवळ लागून नितीनचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी रावण रसाळ याने लोहारा पोलिस ठाणे गाठून लोहारा (खुर्द) येथे खून झाला असून, राम रसाळ याने खून केल्याची खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता; परंतु पोलिसांना संशय आल्याने अधिक चौकशी केली असता आरोपी रसाळ याने आपणच गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून खून केल्याची कबुली दिली.

 

HTML img Tag Simply Easy Learning

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!