“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभासाठी सुलभ अर्ज प्रक्रिया www.ladkibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध
ठाणे, दि.१ (जिमाका) “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ दि.1 ऑगस्ट पासून सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.
ज्या लाभार्थ्यांनी “नारी शक्ती दूत” ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही.
ज्या पात्र इच्छुक महिला लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्यांनी www.ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून आपले अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. गायकवाड यांनी केले आहे.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!
Ok