धाराशिवमहाराष्ट्रसामाजिक

दुष्काळावर मात करण्यासाठी ‘जलतारा प्रणाली’चा पर्याय; लोहाऱ्यात उद्या कार्यशाळा !

शेतकऱ्यांना जलसंधारणाचे मार्गदर्शन; डॉ. पुरुषोत्तम बागल सर यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन

लोहारा (प्रतिनिधी) : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची गरज असताना, जलसंधारणासाठी कमी खर्चात प्रभावी ठरणाऱ्या ‘जलतारा प्रणाली’ची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोहारा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता लोहारा (बु.) येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात ही कार्यशाळा होणार आहे.


आर्ट ऑफ लिव्हिंग आणि ‘सेव्ह ग्राउंडवॉटर’ यांच्या सहकार्याने तसेच शेतकरी विकास संस्थेच्या पुढाकारातून आयोजित या कार्यशाळेत जलसंधारणाचे महत्त्व, भूजलपातळी वाढविण्याचे उपाय आणि शेतशिवारात पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
सध्याच्या पाणीटंचाईवर भविष्यात कायमस्वरूपी आणि समाधानकारक पर्याय म्हणून डॉ. पुरुषोत्तम बागल सर यांनी अत्यंत कमी खर्चिक व प्रभावी जलतारा प्रणाली संशोधित केली आहे. या प्रणालीची कार्यपद्धती, उपयोग आणि प्रत्यक्ष शेतात तिचा कसा अवलंब करता येईल, याची माहिती कार्यशाळेतून दिली जाणार आहे.
पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत मुरविणे, भूजलसाठा वाढविणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवणे, या दृष्टीने जलसंधारणाच्या उपाययोजना महत्त्वाच्या ठरत आहेत. त्यामुळे या कार्यशाळेतून शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापनाचे नवे पर्याय समजून घेण्याची संधी मिळणार आहे.
लोहारा व परिसरातील शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून जलसंधारणाविषयी माहिती घ्यावी आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक शेतकरी विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यशाळेचा तपशील :
दिनांक : शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा (बु.)
आयोजक : शेतकरी विकास संस्था, धानुरी, ता. लोहारा, जि. धाराशिव

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!