लोहारा | प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लोहारा तालुक्याच्या वतीने आज शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता स्वरांजली मोटर्स, लोहारा येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला शिवसैनिक, पदाधिकारी, युवा सेना कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य हिंदुत्ववादी भूमिका, अन्यायाविरुद्धचा निर्भीड लढा, मराठी माणसाच्या हक्कासाठी दिलेले योगदान आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी उभे राहण्याची त्यांची परंपरा यावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी बोलताना अमोल बिराजदार यांनी सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक नेते नव्हते, तर ते विचार होते. आजही त्यांचे विचार शिवसैनिकांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात. लोहारा तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील.”
कार्यक्रमास तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अमोल बिराजदार, शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटील, शहर प्रमुख सलीम शेख, माजी नगरसेवक शाम नारायणकर,कानेगाव जिल्हापरिषद च्या उमेदवार प्रतिभा कदम, भातागळी पंचायत समितीचे उमेदवार विनायक बारगळ, हिप्परगा पंचायत समितीचे उमेदवार अनिल मोरे, जेवळी पंचायत समितीचे उमेदवार अरुण हावळे, माजी सभापती विलास भंडारे, शाखाप्रमुख बालाजी जाधव,बळीराम गोरे, महादेव आनंदगावकर, दत्ता पाटील, अनिल गोरे, गोपाळ गोरे, श्रीकृष्ण गंगणे,योगेश जाधव, तुलसीदास शिंदे,युवासेना शहरप्रमुख प्रेम लांडगे,कांत कदम,बालाजी लोभे,संजय लोभे,नितीन जाधव,गणेश फत्तेपुरे,राजू स्वामी, रघुवीर घोडके,अमोल पाटील, पप्पू जाधव, बळवंत करंडे, धीरज कदम, प्रमोद चंदनशिवे,प्रदीप मडुळे, दिनकर चंदनशिवे,राहूल मुळे,सत्यजित भोसले, बापू पाटील, कांत गोरे, बालाजी होनाळकर,प्रभाकर मोरे, जितू मुळे, काका मुळे यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाळासाहेबांना अभिवादन केले.
युवकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला. आगामी काळात सामाजिक, जनहिताचे व संघटनात्मक उपक्रम अधिक जोमाने राबविण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रम शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. उपस्थित सर्व शिवसैनिकांनी “जय महाराष्ट्र” च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.