महाराष्ट्रशैक्षणिक
लोहाऱ्यातील समृद्धीचा ‘SSC टॉपर’ होण्याचा अभिमान !

लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील नागराळ (लो) गावची कन्या समृद्धी अंकुश शिंदे हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इ. १० वी (SSC) परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
समृद्धीने १००% टक्के मिळवले असून, सर्व विषयांमध्ये उत्तम गुण मिळवत आपल्या कुटुंबासह संपूर्ण गावाचे नाव उज्वल केले आहे. तिने संस्कृत विषयात १०० पैकी १००, इंग्रजी आणि गणितात प्रत्येकी ९७, सामाजिक शास्त्रात ९८, विज्ञानात ९४ आणि मराठीत ९३ गुण मिळवले आहेत.
तिच्या या यशामध्ये आई – वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि शाळेतील शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. समृद्धीच्या यशामुळे नागराळ (लो) गावात आनंदाचे वातावरण असून, सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.
हा निकाल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. समृद्धीच्या पुढील वाटचालीसाठी साप्ताहिक तिचे हार्दिक अभिनंदन करते आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते.
या यशाबद्दल लोहारा शहरातील दगडू रसाळ (मिस्त्री) कुटुंबाकडून समृद्धीचा सत्कार करण्यात आला आहे.



