धाराशिवमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबरला जेवळी दौऱ्यावर; दिवाळी शिधा वाटप कार्यक्रमाला राहणार उपस्थित!
शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांची माहिती; सायंकाळी ७.३० वाजता जेवळीत आगमन

लोहारा : धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, सायंकाळी ७.३० वाजता लोहारा तालुक्यातील जेवळी येथे त्यांचे आगमन होणार आहे. यावेळी आयोजित दिवाळी शिधा वाटप कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यामुळे जेवळी परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
HTML img Tag
HTML img Tag

राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांचा हा दौरा जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिधा वाटप कार्यक्रमाला पालकमंत्र्यांची उपस्थिती लाभणार असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.



