राजकीय
लोहारा तालुक्यात चार जिल्हा परिषद गटांसाठी ३७ उमेदवारी अर्ज दाखल; राजकीय हालचालींना वेग

लोहारा ( जि. धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, चारही जिल्हा परिषद गटांच्या जागांसाठी एकूण ३७ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने मैदानात उतरल्यामुळे लढत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
महायुती व आघाडीतील जागावाटपाच्या चर्चांदरम्यान काही गटांमध्ये तिढा कायम असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल करण्याचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्जांची माघार प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून, प्रत्येक गटात बहुरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद निहाय उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे







