लोहारा / उमरगा : मौजे. भातागळी ता.लोहारा येथील अनेक युवकांनी महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या विकसनशील नेतृत्वावर विश्वास ठेवून आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल व शिवसेना पक्ष संघटना बळकट कराल, असा विश्वास आमदार ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केला. प्रवेश केलेल्यांमध्ये पंडू केरबा खंडाळे संजय खंडाळे दिगंबर खंडाळे सचिन हजारे राम हजारे राजू रोडगे सुदर्शन खंडाळे सुरज खंडाळे दयानंद मिसाळ आसिफ शेख कैलास मिसाळ किरण मिसाळ दादा मिसाळ ऋतिक खंडाळे राघवेंद्र कुलकर्णी दादा संजय जगताप आदींचां समावेश आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, अभिमान खराडे,अविनाश माळी, प्रमोद बंगले, के.डी.पाटील, आरिफ खानापुरे, श्रीकांत भरारे, दिपक रोडगे, विजयकुमार ढगे, अमीन सुंबेकर, ओम कोरे, आयुब शेख, जालिंदर कोकणे, राजेंद्र माळी, अरुण जगताप, जितेंद्र कदम, माजी सरपंच अरुण माळवदकर, विनोद मुसंडे, युवा सेना तालुकाप्रमुख दत्ता मोरे, रमेश टेलर, अंगद भोंडवे, गौतम लटके आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Appa Kawhte