धाराशिव

उद्योग विकासातून रोजगारनिर्मितीसाठी आमदार स्वामींचा पुढाकार; Arche Components कंपनीला सदिच्छा भेट

युवकांच्या कौशल्य विकासासह उद्योगाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांवर सकारात्मक चर्चा

लोहारा (प्रतिनिधी) : उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी ३० ऑक्टोबर रोजी पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील Arche Components Pvt. Ltd. या कंपनीला सदिच्छा भेट दिली. यावेळी उमरगा-लोहारा तालुक्यातील युवकांसाठी कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

HTML img Tag
HTML img Tag Simply Easy Learning
Simply Easy Learning

या भेटीप्रसंगी युवराज माने आणि शरण औशेकर यांची उपस्थिती होती. मराठवाडा कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशन (MCIA) यांच्या वतीने स्थानिक युवकांना औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे, त्यांना रोजगाराभिमुख बनविणे तसेच उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, या विषयांवर विचारविनिमय करण्यात आला.

उमरगा-लोहारा तालुक्यातील युवकांना स्थानिक पातळीवर कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्यास त्यांना औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळण्यास मदत होऊ शकते. तसेच उद्योग आणि युवक यांच्यात समन्वय निर्माण करून परिसरातील औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनेही या चर्चेला महत्त्व आहे.

उद्योग विकासातून रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासातून युवकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने भविष्यात विविध उपक्रम राबविण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. आमदार स्वामी यांनी कंपनीला दिलेल्या भेटीबद्दल Arche Components Pvt. Ltd. चे श्री. दत्तात्रय राठोडे आणि विवेक राठोडे (माणिककर) यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!