धाराशिवकृषी

लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या!

खरीप पिकांसह फळबागांचे १०० टक्के नुकसान; विनाअट सरसकट पंचनामे करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

HTML img Tag Simply Easy Learning

लोहारा (प्रतिनिधी) : सततच्या पावसाच्या खंडामुळे लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे विनाअट सरसकट पंचनामे करून प्रत्येक हेक्टरमागे ५० हजार रुपये आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी के. गयाबाई रावसाहेब पाटील बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेखर रावसाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

       लोहारा तालुक्यासह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे तसेच फळबागांचे जवळपास १०० टक्के नुकसान झाले आहे. शासनाच्या ई-पीक पाहणी अॅपवरील नोंदी, फोटो, लोकेशन अथवा अन्य तांत्रिक अडचणींचा आधार घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, २३ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दौऱ्यादरम्यान धाराशिव व लातूर जिल्ह्यांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीनंतर धाराशिवसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तालुक्यांचा आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देताना तांत्रिक अडचणींचा अडसर न आणता तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

दसरा व दिवाळीचे सण जवळ आले असताना शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रत्येक हेक्टरमागे ५० हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावेत.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीचा हात द्यावा, असे निवेदनात नमूद केले आहे.
हे निवेदन ३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार, लोहारा यांच्यामार्फत देण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!