जिल्हास्तरीय निपुनोत्सव स्पर्धेत स्वानंदी नाईक हिचे यश

लोहारा : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धाराशिव मार्फत भाषा व गणित विषयाची केंद्रस्तरीय निपुनोत्सव,तालुकस्तरीय निपुनोत्सव स्पर्धा घेण्यात आली. भाषा विषयात तालुक्यातून प्रथम आल्याने विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय निपुनोत्सव स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धाराशिव येथे घेण्यात आली.
यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथील विद्यार्थीनी स्वानंदी बालाजी नाईक हिने भाषा विषयात वर्ग पहिलीच्या गटात जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक मिळवला. घवघवीत यशाबद्दल विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव,सुभाष चव्हाण, पांडुरंग पुजारी केंद्रप्रमुख विश्वजित चंदनशिवे,मुख्याध्यापक मधुकर रोडगे वर्गशिक्षका महानंदा चव्हाण, विकास घोडके, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक,तसेच एस.एस.सी. 2000 बॅचने अभिनंदन केले आहे.




Congratulations Swanandi!!