धाराशिव : महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविघालयीन व समूह विघापीठे शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन/नविन शैक्षणिक धोरणा बाबतची कार्यशाळा गणेश कला क्रिडा मंच,स्वारगेट,पुणे येथे संपन्न होत आहे.या अधिवेशनात शासनाने केलेल्या कामाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे त्याच बरोबर शिक्षकेत्तर कर्मच्या-यांचे जे काही प्रलंबीत प्रश्न आहेत त्या प्रश्नांनां वाचा फोडण्यासाठी व नविन शैक्षणिक धोरणा बाबतची माहीती ईत्यादी विषयावर अधिवेशन संपन्न होत आहे.
या अधिवेशनाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील,उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री मा.इंद्रनील नाईक,व आणखी काही मा.मंत्री व मा.आ.विक्रम काळे आणखी लोक प्रतीनिधी त्याच बरोबर प्रधान सचिव मा. बी.वेणूगोपाल रेड्डी,राज्याचे शिक्षण संचालक मा.शैलेंद्र देवळाणकर यांच्या उपस्थितीत व प्रमुख मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन संपन्न होत आहे. त्याच बरोबर उच्च शिक्षण विभागातील उच्च पदस्थ अधिकारी हे अधिवेशनाला उपस्थित असणार आहेत.

या अधिवेशनाला राज्यातील जास्तीत जास्त शिक्षकेत्तर बंधु भगिनी त्याच बरोबर सेवानिवृत्त कर्मच्यां-यानी उपस्थित रहावे, असे आवाहान संघटनेचे अध्यक्ष मेघराज पंडीत, विष्णू खोजे,रमेश पवार, संतोष मोरे,डाॅ.शिरीष देशमुख, संतोष चौधरी,सतिश जगताप,मारुती कदम, कांबळे सर, प्रविण पाटील,भैरवनाथ शिंदे, तुंगे सर, निशांत हिरवे, शाहीवाले सर, चांदोबा हालंगुडे, नामदेव काळे, अमित अलूरे व ईतर पदाधिकारी यांनी केले आहे.
Back to top button
error: Content is protected !!