महाराष्ट्र
भारतीय कृषी विमा कंपनीचे अपील राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने फेटाळले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश

मुंबई : खरीप 2022 संदर्भात आज मंत्रालय मुंबई येथे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक बोलवण्यात आली होती. भारतीय कृषी विमा कंपनीने विभागीय आयुक्तांच्या विरोधात राज्यस्तरीय तक्रार समितीकडे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने आजची बैठक बोलवण्यात आली होती.
भारतीय कृषी विमा कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे द्यावेत, पंचनामातील नुकसान भरपाई प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, बात केलेल्या पूर्व सूचना चे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी असे आदेश देण्यात आले त्यामुळे राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक आज धारेश्वर जिल्ह्याच्या दृष्टीने यशस्वी झाली.