लोहारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमरगा व लोहारा तालुक्यातील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या बुधवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता लोहारा तालुक्यातील जेवळी उत्तर येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन ते मतदारांशी संवादातून करणार आहेत.
या जाहीर सभेसाठी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. प्रताप सरनाईक, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी राज्यमंत्री तथा तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, धाराशिवचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, उ.जि.स. बँक धाराशिवचे चेअरमन बापूराव काका पाटील, नगराध्यक्ष उमरगा किरण भैया गायकवाड, उ.जि.स. बँक उमरगाचे चेअरमन शरण भैया पाटील, तसेच माजी सभापती जि.प. धाराशिव अभय भैया चालुक्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महायुतीच्या या शक्तिप्रदर्शनात्मक सभेसाठी उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बंधू-भगिनींसह लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज धोंडीराम चौगुले,शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांनी केले आहे.
सभा तपशील
📅 बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६
⏰ सकाळी ११ वाजता
📍 स्थळ : जेवळी उत्तर, ता. लोहारा
महायुतीच्या या जाहीर सभेमुळे उमरगा–लोहारा तालुक्यातील निवडणूक वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ही सभा निर्णायक ठरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.