धाराशिव

महाशिवरात्री निमित्त लोहार्‍यात शिवभक्तांसाठी फराळाचे आयोजन

लोहारा : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर लोहारा शहरातील शंभू महादेव मंदिर येथे दिनांक १५ फेब्रुवारी रोजी शिवभक्तांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे आयोजन चालक मालक संघटना यांच्या वतीने करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भक्तीभाव, सेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. फराळाची व्यवस्था दर्शनानंतर सर्व शिवभक्तांसाठी खुली राहणार असून, संयोजनासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

शिवभक्तांनी वेळेवर उपस्थित राहून फराळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!