लोहारा | प्रतिनिधी
लोहारा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत यंदाचे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणात पार पडले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य, अभिनय आणि लोककलेच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

या स्नेहसंमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व नटराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष अमीन सुबेकर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष हरी लोखंडे, मुख्याध्यापक दत्ता फावडे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी शिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, विस्तार अधिकारी व्ही. एस. चंदनशिवे, शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष अमीर हमजा खुंटेपड, अमोल बिराजदार, नगरसेवक प्रशांत काळे, सदस्य जसवंतसिंग बायस, सुनीता लोहार, ज्योती स्वामी, अश्विनी अपसिंगेकर यांच्यासह शिक्षणप्रेमी नागरिक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्नेहसंमेलनात शाळेतील बालकलाकारांनी मराठी व हिंदी गीतांवर भरतनाट्यम्, कोळी नृत्य, गवळण, गोंधळ, भक्तिगीते, दांडिया, चिपरी वाद्य, मुक अभिनय, बडबड गीत, साउथ इंडियन रिमिक्स आदी कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक व शैक्षणिक संदेश देणाऱ्या सादरीकरणालाही उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

‘संस्कृती – कलर्स ऑफ इंडिया’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी भारतातील विविध संस्कृती, लोकनृत्ये व परंपरांचे प्रभावी दर्शन घडवले. रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृहात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
या स्नेहसंमेलनाला एक ते दोन हजारांहून अधिक पालक, महिला, विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचे मनापासून कौतुक केले. शाळेने नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले असून ‘जल्लोष’ हे स्नेहसंमेलन त्याचाच एक भाग असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बालाजी मक्तेदार, रमेश बनसोडे व रेखा नारायणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सूर्यकांत पांढरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक प्रमुख बालाजी मक्तेदार, रमेश बनसोडे, रेखा नारायणकर यांच्यासह शफिक गवंडी, एस. एम. बोरसुने, एस. सी. माळवदकर, यू. बी. बर्डे, सुरेखा कंठीकर, तांबोळी, पठाण, साखरे मॅडम, क्षीरसागर, अंबुरे, अनंत सुतार, अप्पाराव पांढरे, संजय संधीकर आदी शिक्षकवृंद व शालेय शिक्षण समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
पालक, महिला व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करत या स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला.
Back to top button
error: Content is protected !!