धाराशिव

जि.प. लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचा लोहारा येथे कामबंद आंदोलनाचा इशारा

लोहारा | प्रतिनिधी
जिल्हा परिषदेमधील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लोहारा येथे कामबंद आंदोलन करण्यात आले. जय महाराष्ट्र शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले असून मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, चौथ्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, तसेच १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनाला जिल्हा प्रमुख मार्गदर्शक श्री एन. व्ही. कुंभार, तालुका अध्यक्ष श्री बी. एस. साळुंखे, तालुका उपाध्यक्ष श्री एल. एस. साठे, सचिव श्री के. व्ही. भुजबळ, तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री वाय. एच. शेख, तालुका महिला उपाध्यक्ष श्रीमती एस. एस. लोकरे, तालुका महिला संघटक श्रीमती ए. जी. सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी संघटनेचे इतर पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!