लोहारा : धाराशिव जिल्ह्यातील कब-बुलबुल व स्काऊट-गाईड जिल्हा मेळावा 2026 हा दि. 9 ते 11 फेब्रुवारी 2026 दरम्यान नरेंद्र आर्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अपसिंगा (ता. तुळजापूर) येथे अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला.
या मेळाव्यात लोहारा तालुक्यातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल, लोहारा येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत बक्षिसांची लयलूट केली.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. विनय भोसले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मैनाक घोष, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. नागेश मापारी, स्काऊट-गाईड जिल्हा संघटक श्री. विक्रांत देशपांडे, जिल्हा सरचिटणीस श्रीमती उषा सर्जे, संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव सांजेकर, सचिव श्री. शंकर मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यात जिल्ह्यातील 47 शाळांमधील सुमारे 1200 विद्यार्थी सहभागी झाले होते.
मार्गदर्शन करताना श्री. मैनाक घोष यांनी सांगितले की, कब-बुलबुल व स्काऊट-गाईड चळवळीमुळे शिस्त, प्रामाणिकपणा, स्वावलंबन, आत्मविश्वास आणि सहकार्याची भावना विकसित होते. त्यामुळे भविष्यात चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व व जबाबदार नागरिक घडण्यास मदत होते.
तीन दिवस चाललेल्या या मेळाव्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल, लोहारा येथील कब-बुलबुल विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत
समूहगीत स्पर्धेत कबनी – तृतीय क्रमांक, शेकोटी कार्यक्रम नृत्य स्पर्धेत बुलबुल – द्वितीय क्रमांक,
तसेच शोभायात्रेत उत्कृष्ट सहभाग नोंदवला.
या यशासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील मिस सविता जाधव व मिस दिपिका देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. शहाजी जाधव, तसेच श्री. सिद्धेश्वर सुरवसे, श्री. रमेश गिराम, मिस सोनाली काटे, अनिता मनशेट्टी, वैशाली गोरे, मीरा माने, साक्षी कुंभार, वैशाली जाधव, अर्चना सोनके, सुलोचना वकील, रेश्मा शेख, सुलक्षणा जाधव यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्गाकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या या यशामुळे लोहारा तालुक्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.