धाराशिव : दिनांक – 18 फेब्रुवारी 2025 रोजी धाराशिव येथील नूतन पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या इमारतीमध्ये उप- प्रादेशिक परिवहन विभाग व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय परिवहन समिति धाराशिव जिल्हा यांची बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी धाराशिव जिल्ह्याचे मा. पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व उप – प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री हर्षल डाके, उप शिक्षण अधिकारी श्री दत्तात्रय लांडगे,शिक्षण विस्तार अधिकारी श्री भारत देवगुडे, श्रीमती रंजना मैंदर्गी, धाराशिव जिल्हा इंग्लिश स्कूल संस्थाचालक संघटनेचे सचिव श्री शहाजी जाधव, कोषाध्यक्ष श्री भास्कर बोंदर, सहसचिव श्री सचिन पाटील, श्री धनजंय शहापुरे, विध्यार्थी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी, महाराष्ट्र शासन परिवहन अधिकारी, धाराशिव नगर परिषदेचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील अनेक शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्रतिनिधि उपस्थित होते. याप्रसंगी सर्वप्रथम मेस्टा संघटनेतर्फे धाराशिवचे पो. अ.श्री संजय जाधव (भा.पो.से.) यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर श्री डाके यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन केले आणि धाराशिव जिल्ह्यात स्कूल बसमध्ये ये – जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता याविषयी हि बैठक आयोजित केल्याचे सांगून त्यासंदर्भात जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत शालेय परिवहन समिति स्थापन असावी, स्कूलबसमध्ये GPS, अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार पेटी, उपलब्धता असावी तसेच स्कुलबसची टॅक्स, इन्शुरन्स, पियूसी, फिटनेस केलेले असावे , शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, सर्व स्कूल बस चालक प्रशिक्षित व लायसन्सधारक व बसमध्ये मदतनीस म्हणून महिला कर्मचारी असावेत यासह अन्य सर्व सुविधा उपलब्ध करून सर्व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून सहकार्य करावे असे मार्गदर्शन केले.
तसेच क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थांची वाहतूक केल्यास व अनधिकृत खाजगी स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने – आन केल्याचे निदर्शनास आल्यास संबधितावर कठोर कार्यवाही केली जाईल अशी माहिती दिली. बैठकीस जिल्ह्यातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, विविध संघटनेचे पदाधिकारी, संबधीत कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.