क्राईम
जेवळी येथील तीस वर्षिय तरुणांची अत्महत्या

लोहारा : आर्थिक अडचणीतून आलेल्या जेवळी (ता. लोहारा) येथील शेतकरी युवकाने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. १) सकाळी घडली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जेवळी (ता. लोहारा) येथील युवा शेतकरी गंगाराम राजपाल राजपुत (वय ३०) यांने मित्रांकडून व नातेवाईकांकडून पैसे उसने घेवून आपल्या शेतात विहीर, पत्र्याचे शेड, शेतामध्ये पाईप लाईन केली आहे. तसेच शेतीसाठी ट्रॅक्टरही घेतला होता. परंतु हे पैसे वेळेवर परत देणे व हप्ता भरणे शक्य होत नसल्याने नैराशेत होता. शेवटी शनिवारी (ता.१) सकाळी साडे सतच्या सुमारास आपल्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेवुन जीवन यात्रा संपवली. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार कान्तू राठोड करीत आहेत.