धाराशिवराजकीय

भातागळीत महिला मतदारांचा प्रतिसाद

लोहारा : पंचायत समिती लोहारा निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भातागळी गणातील निवडणूक वातावरण तापू लागले असून, विविध उमेदवारांचा मतदारांशी संपर्क सुरू आहे.

या अनुषंगाने अपक्ष उमेदवार सुयशकुमार रंजना दत्तु दंडगुले यांनी गावभेटी व संवादावर भर दिला आहे.
भातागळी व परिसरातील गावांमध्ये करण्यात आलेल्या भेटीदरम्यान महिला मतदारांनी संवाद साधत आपल्या विविध प्रश्न व अपेक्षा मांडल्या.

स्थानिक विकास, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी विषयांवर महिलांमध्ये चर्चा होत असल्याचे चित्र दिसून आले. प्रचाराच्या दरम्यान महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय असल्याचेही पाहायला मिळाले.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले ‘नारळ’ हे निवडणूक चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराने आचारसंहितेचे पालन करत मतदारांशी संपर्क साधला.

आगामी निवडणुकीत महिला मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!