राजकीयधाराशिव

मोघा खुर्द येथे घरभेटी देत मतदारांशी संवाद

लोहारा : पंचायत समिती लोहारा निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भातागळी गणातील मोघा खुर्द गावात उमेदवारांकडून मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. या अनुषंगाने अपक्ष उमेदवार सुयशकुमार रंजना दत्तु दंडगुले यांनी मोघा खुर्द येथे घरभेटी देत मतदारांशी संवाद साधला.

या भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांच्या स्थानिक समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण यासह दैनंदिन प्रश्नांवर चर्चा झाली. प्रचाराच्या वेळी महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग दिसून आला.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले ‘नारळ’ हे त्यांचे निवडणूक चिन्ह असून, निवडणूक आचारसंहितेचे पालन करत प्रचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. भातागळी गणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला गती येत असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!