क्राईम

उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले

 

धाराशीव : 9 मे 2025 — भूमी अभिलेख कार्यालय कळंब, जिल्हा धाराशीव येथे कार्यरत असलेल्या उपअधीक्षक पदावरील निमतनदार अधिकाऱ्याला 5000 रुपयांच्या लाचेपैकी पहिला हप्ता म्हणून 3000 रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ला.प्र.वि.) पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.

तक्रारदार (वय 24) यांनी त्यांच्या नावावरील गट क्र. 239 मधील शेतजमिनीची हद्द कायम मोजणीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयाचे लोकसेवक राजू गंगाराम काळे (वय 54, रा. आशीर्वाद नगर, अंबड रोड, जालना) यांनी मोजणी केली. मात्र, त्यांनी हद्द कायम खुणा करण्याच्या कामासाठी 5000 रुपयांची लाच मागितली.

तक्रारदाराने तत्काळ ला.प्र.वि. धाराशीव कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानुसार 9 मे रोजी शिवाजी चौक, कळंब येथे सापळा रचण्यात आला. तपासणीदरम्यान काळे यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी करत 3000 रुपये स्वीकारले. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली.

अंगझडतीमध्ये 3000 रुपये लाच रक्कम, आणखी 7620 रुपये रोख, एक 5 ग्रॅम वजनाची पिवळ्या धातूची अंगठी, मोजणी कागदपत्रांची फाईल, Vivo मोबाईल व Asus लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. आरोपीच्या घराची झडती सुरू असून, त्याच्या मोबाईलमधील माहितीची तपासणी केली जात आहे.

या प्रकरणी कलम 7, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत पोलीस ठाणे कळंब येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीस अटक करून पुढील तपास सुरू आहे.

सापळा कारवाईतील अधिकारी व पथक:

  • सापळा अधिकारी: श्री. नानासाहेब कदम, पो.नि., ला.प्र.वि. धाराशीव

  • सापळा पर्यवेक्षण अधिकारी: श्री. सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक

  • मार्गदर्शक अधिकारी: श्री. संदीप आटोळे (पोलीस अधीक्षक) व श्री. मुकुंद आघाव (अपर पोलीस अधीक्षक)

  • सापळा पथकातील सदस्य: सिद्धेश्वर तावसकर, शशिकांत हजारे, आशिष पाटील, जाकेर काझी

भ्रष्टाचारासंदर्भात तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक: 1064

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!