लोहारा : पंचायत समिती लोहारा निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भातागळी गणातून युवक सुयशकुमार रंजना दत्तु दंडगुले हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असतानाही पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष मार्ग स्वीकारला आहे.
निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने श्री. दंडगुले यांनी गावभेटीवर भर दिला असून, तालुक्यातील मोघा (बु.) येथे त्यांनी मतदारांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान नागरिकांनी त्यांच्या प्रचाराला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले ‘नारळ’ हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे. आगामी निवडणुकीत भातागळी गणात अपक्ष उमेदवार म्हणून ते मतदारांच्या संपर्कात राहून प्रचार करत आहेत.