लोहारा (दि. १२ सप्टेंबर) : लोहारा शहरातील श्री जयलक्ष्मी माऊली ज्वेलर्स दुकान फोडीत चोरीस गेलेला सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल लोहारा पोलीस स्टेशनने दुकान मालकास परत केला आहे.
दि. १५ जुलै २०२५ रोजी झालेल्या या चोरीतील मुद्देमाल वारजे माळवाडी (पुणे) पोलीस स्टेशनला सापडला होता. तर चोरीस गेलेली टाटा सुमो गाडी लोहारा पोलिसांनी ताब्यात घेतली होती. न्यायालयीन आदेशानुसार हा मुद्देमाल दि. १२ सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार व सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी ज्वेलर्सचे मालक अविनाश माळी यांच्याकडे स्वाधीन केला.

जोडवे, ब्रासलेट, वाले, चैन, किचन, अंगठी, कडे, ताट अशा चांदीच्या वस्तूंचा समावेश या मुद्देमालात होता. या वेळी श्री माऊली ज्वेलर्स यांच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या नागरिकांना व पोलीस कर्मचार्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी ब्लू स्टार कंपनीचा वॉटर कुलर भेट देण्यात आला. तसेच एसडीपीओ शेलार व एपीआय कुकलारे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, शिवसेना नेते राजेंद्र माळी, सराफ संघटना तालुकाध्यक्ष संभाजी पोतदार, पं.स. माजी सदस्य इंद्रजीत लोमटे, दिपक रोडगे, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहेब पाटील (मार्डी), माजी गटनेते अभिमान खराडे, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, सोसायटी चेअरमन बालाजी बाबळे (मोघा), ग्रामपंचायत सदस्य नारायण क्षीरसागर (हिप्परगा रवा), राजेंद्र सुर्यवंशी, राजेंद्र पाटील, शाम राठोड, शहरातील ज्वेलर्स दुकानदार अहेमद शेख, पिंटु पोतदार, महेश पोतदार, दत्ता पोतदार, शुभम महामुनी, ज्ञानेश्वर काडगावे यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!