लोहारा : पंचायत समिती लोहारा निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भातागळी गणातील बेलवाडी गावात उमेदवारांकडून मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. या अनुषंगाने अपक्ष उमेदवार सुयशकुमार रंजना दत्तु दंडगुले यांनी बेलवाडी गावात डोअर-टू-डोअर प्रचार केला.
या प्रचारादरम्यान त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न, समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या.
पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी विषयांवर मतदारांनी आपली मते मांडली. प्रचाराच्या वेळी महिला व ज्येष्ठ नागरिकांचा सहभागही लक्षणीय असल्याचे दिसून आले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले ‘नारळ’ हे त्यांचे निवडणूक चिन्ह असून, आचारसंहितेचे पालन करत प्रचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. भातागळी गणात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग येत असल्याचे चित्र आहे.