धाराशिव
लोहारा शहर पान टपरी युनियनकडून दरात बदल; १ फेब्रुवारीपासून नवे दर लागू

लोहारा : लोहारा शहर पान टपरी युनियनकडून १ फेब्रुवारी २०२६ पासून पान-सुपारी व संबंधित पदार्थांच्या दरात बदल करण्यात आला आहे. याबाबतची सुधारित दरयादी युनियनने जाहीर केली असून शहरातील सर्व पान टपर्यांवर हे नवे दर लागू राहणार आहेत.
जाहीर केलेल्या दरयादीप्रमाणे छिटा सुपारी व रजनीगंधा प्रत्येकी २० रुपयांनी, बेलगाव सुपारी व राजरत्न १५ रुपयांनी, तर कलकत्ता मसाला पान ३० रुपयांनी वाढविण्यात/ठरविण्यात आले आहेत. साधा पान व चटणी पान यांचे दर १० रुपये, १२०+३०० कलकत्ता पान २० रुपये, १२०+३०० पान १५ रुपये, मसाला सुपारी १५ रुपये आणि कलकत्ता चटणी २० रुपये असे निश्चित करण्यात आले आहेत.




