औसा (प्रशांत नेटके) :- औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील कै. सुशिलाबाई त्रिंबकराव पाटील विद्यालयात इयत्ता दहावीच्या 2008 बॅच मधील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा स्नेहमेळावा 31 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते. विद्यालयाची स्थापना होऊन जवळपास 24 वर्ष पूर्ण झाली ,प्रथमच आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यामुळे विद्यार्थी जुन्या आठवणींत रममान झाले.
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी बिराजदार होते ,मंचावर शिक्षक गंगाधर मुळजे , काका फडणीस , सुभाष मालू , नागनाथ सूर्यवंशी , नागेश रामशेट्टी ,भास्कर खवडे , तानाजी बिरादार तर प्रमुख पाहुणे जगदीश पाटील, बीबीशन गरड यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित शिक्षकांच्या हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले. त्यानंतर गेट टूगेदर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . कार्यक्रमाचे संयोजक विद्यार्थी विध्यार्थीनी तनुजा भोळे, स्वाती शिंदे, संगिता कलशेट्टी, प्रियांका घूळे, गंगाबाई मंमाळे, महानंदा भोसले, वर्षा बनसोडे, गोगल तुगावे,सावित्री यरनुळे, लक्ष्मी सुरवसे, पल्लवी मोरे, सुंदर गायकवाड ,राम येरनुळे, गोविंद येरनुळे, बाळासाहेब पळसे, लालासाहेब सय्यद, आरिफ शेख, अतुल पठाण ,अरुणकांत गाढे, सिध्देश्वर मोरे, बाळासाहेब तुगावे, नेताजी येरनुळे, उमेश बिराजदार, मारुती बिराजदार, दिलीप लादे,अजित लादे, संभाजी शिंदे, अमोल कच्चवे, उमेश तौर, पांडुरंग चव्हाण, नीळकंठ कल्याणी,सादिक शेख, विजयकुमार व्हनाळे, किरण चाकुरे यांनी शिक्षक वृंदाचा शाल श्रीफळ ,पुष्पहार देऊन सत्कार केला.
यावेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवत असतानाचे अनुभव सांगितले. शाळेतून मिळालेले ज्ञान व शिस्तीचे धडे पुढील जीवनासाठी शिदोरी असते, असे सांगून विध्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासाठी शिक्षकांबरोबर विद्यार्थी व पालक त्यांची भूमिका महत्वाची असते असे विचार व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात बिराजदार सरांनी या बॅच च्या आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रश्नमंजुषा ,संगीतखुर्ची ,मनोगत घेऊन त्यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 17 वर्षांनंतर आजही हे विद्यार्थी विध्यार्थीनी एकत्रित भेटले होते , याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता .2008 दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार करून स्नेहमेळावा आयोजित करून यशस्वी होण्यासाठी ग्रुप ऍडमीन संगीता कलशेट्टी राम येरनुळे यांचे यावेळी कौतुक करण्यात आले.