शैक्षणिक
आधुनिक युगात महिलांनी मातृत्वातून आपली संस्कृती व संस्कार मुलांवर रुजवावेत – ब्रम्हाकुमारी सरिता बहणजी

लोहारा ( धाराशिव ) : आज दिनांक 03 जानेवारी 2025 रोजी लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व बालिका दीन निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती शोभाताई झिंगाडे, उद्घाटक म्हणून अँड. आकांक्षा चौगुले, लोहारा तहसीलच्या नायब तहसिलदार श्रीमती हर्षाली खडे, लोहारा न.पं. च्या नगराध्यक्षा सौ वैशाली खराडे, प्रमूख अतिथी म्हणून नगरसेविका श्रीमती शामलताई माळी, सौ.सुमन रोडगे , सौ आरती कोरे, माजी जि. प. सदस्या मीराताई माळी, पालक प्रतिनिधी माजी सभापती चंद्रकला नारायणकर, ब्रम्हाकुमारी सरिता बहनजी, परिक्षक श्री दिपक पोतदार, प्रा. यशवंत चंदनशिवे, स्कुलचे प्राचार्य श्री शहाजी जाधव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शहाजी जाधव यांनी सांगितले की, 03 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त “बालिका दिन ” साजरा केला जातो, त्यानिमित्त स्कुलमध्ये विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा व माता पालकांसाठी रांगोळी स्पर्धा व डिश डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यावेळी उपस्थित विध्यार्थी व महिला पालकांना मार्गदर्शन करताना आकांक्षाताई म्हणाल्या की, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा विरोध पत्करून मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेवून त्यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरु केली.
विध्यार्थ्यांना शिक्षणासोबत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी अशा कार्यक्रमातून प्रोत्साहन द्यावे. तसेच वेशभूषा स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थी आणि रांगोळी व डिश डेकोरेशन स्पर्धेत सहभागी माता पालकांचे अभिनंदन करून स्पर्धेसाठी शूभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुलींनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत “आज सावित्री नसती तर, मुलगी शिकली असती का ” या गीतावर अतिशय सुंदर नृत्य सादर करून सावित्रीबाई यांना मानवंदना दिली.यानंतर वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी छ.शिवाजी महाराज, शंभूराजे, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, वीर सावरकर, महाराणा प्रताप, महात्मा फुले, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,नरेंद्र मोदी,शेतकरी,वारकरी, पोलीस, सैनिक, वासुदेव, शिक्षक, क्रिकेटर, विध्यार्थी, डॉक्टर, सावित्रीबाई फुले ,राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, रमाबाई रानडे, लता मंगेशकर, कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ, आई, वकिल, जोकर, पुष्पा, डॉन, परी, बार्बी डॉल, वृक्ष, फुलपाखरू, ट्रॅफिक सिग्नल, पाणी, आंबा, द्राक्ष, फुल, भाज्या असे विविध रोल मॉडेल सादर केले उपस्थितांची मने जिंकली.
माता पालकांनीही अतिशय सुंदर व आकर्षक रांगोळीतून सामजिक संदेश देवून स्पर्धेस चांगला प्रतिसाद दिला. स्पर्धेचे परिक्षक म्हणून श्री दिपक पोतदार व प्रा. यशवंत चंदनशिवे यांनी अतिशय पारदर्शकपणे काम पाहिले.