क्राईम
“स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने ठाणे जिल्ह्यातील बेपत्ता एक अल्पवयीन मुलगी ताब्यात”

धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटके, श्री. अमोल मोरे, पोलीस हावलदार- विनोद जानराव, समाधान वाघमारे,मपोहेकॉ/ शैला टेळे, पोलीस नाईक- नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस अंमलदार- विनायक दहिहंडे असे पेट्रोलिंग करीत धाराशिव शहरातील जुना बस डेपो येथील किनारा हॉटेल जवळ आले असता तिथेच रोडचे बाजूला पंजाबी ड्रेस घतलेली एक लहान मुलगी रडत थांबलेली दिसली. त्यावर पथकाने लागलीच तिचे जवळ जावून नमुद पिडीत मुलीकडे विचारपूस करुन तिचे वडीलांचा मोबाईल नंबर घेवून त्यावर संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की, पिडीत मुलगी हिचे दि. 24.12.2024 रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले असावे या बाबत वागळे इस्टेट पोलीस ठाणे येथे गुन्हा क्र. 02 /2025 हा भा.दं.सं. कलम- 137(2) दि. 01.01.2025 अन्वये गुन्हा नोंदवला असल्याचे सांगितल्याने पथकाने लागलीच संबंधीत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गवारे यांचे मोबाईलवर संपर्क साधून सदर माहिती दिली. त्यांनी याबाबत गुन्हा दाखल असल्याचे सांगून सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी पोउपनि महेश चव्हाण हे असुन ते लागलीच तिच्या आई वडीलांसह तीला घेण्यासाठी निघत आहेत असे सांगुन सदर मुलीस सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातुन ताब्यात घेण्यास सांगितले आहे.
तरी सदर गुन्ह्यातील अपहरीत पिडीत मुलगी ही धाराशिव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील जुना बस डेपो येथील किनारा हॉटेल जवळ मिळून आल्याने या अनुषंगाने दाखल गुन्ह्यातील तपास अधिकारी व अपहरीत पिडीतेचे पालक तीचा ताबा घेण्यासाठी येई पावेतो तिस तात्पुरते सुरक्षीततेसाठी धाराशिव पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री.संजय जाधव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, विनोद जानराव, समाधान वाघमारे,मपोहेकॉ/ शैला टेळे, पोलीस नाईक- नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस अंमलदार- विनायक दहिहंडे यांचे पथकाने केली आहे.



