लोहारा ( धाराशिव ) : मागील अनेक वर्षांपासून पत्रकार निळकंठ कांबळे सकाळ समहूच्या माध्यमातून लोहारा या ग्रामीण भागातील तालुक्याच्या ठिकाणी तालुका प्रतिनिधी म्हणून निर्भिड पत्रकारिता करीत आहेत.
सामाजिक जाणिवेतून करीत असलेल्या पत्रकारीतेसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई पिंपरी चिंचवड शहर आणि पत्रकार हल्ला विरोधी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि पत्रकार दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार करिता सकाळचे लोहारा तालुका प्रतिनिधी निळकंठ कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
सदर सन्मान सोहळा सोमवार दि 06 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता ग.दि.माडगूळकर नाट्यगृह,निगडी -पिंपरी चिंचवड येथे मा. उदय सामंत (उद्योगमंत्री,महाराष्ट्र राज्य), मा.मकरंद पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री,महाराष्ट्र राज्य) आणि मा. आकाश फुंडकर (कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.