धाराशिव : मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नवरात्र उत्सवा दरम्यान चोरी, जबरी चोरी इत्यादी मालाविषयक गुन्ह्यांस आळा घालण्यासाठी व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी तुळजापूर मंदीर परिसर व शहरात गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना पथकास दि.06. 10.2024 रोजी माहिती मिळाली की, तुळजाभवानी मंदीरासमोरील शहाजी महाद्वार समोर दोन महिंलाचे पैसे चोरीस गेले आहेत. त्या अनुसरुन पोलीस ठाणे तुळजापूर येथे गुन्हा क्र.458/2024, 459/2024 भा.न्या.सं. कलम- 309(4) अन्वये दाखल आहे. त्यावर पथकास मिळालेल्या माहिती वरुन आरोपीचा शोध घेत असताना पथकास जिजाउ महाद्वार येथे दोन महिला दिसून आल्या पथकाने त्यास ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे- चांदणी राजु लोंढे, वय 42 वर्षे, सुशीला संजय लोंढे, वय 40 वर्षे, रा. टकनेश्वर गल्ली जामखेड जि.अहमदनगर असे सागिंतले. त्यावर पथकाने त्यांचे कडे सदर गुन्ह्या संदर्भात विचारपुस केली असता सदर महिलांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरुन पथकाने त्यांचे ताब्यातुन गुन्ह्यातील रोख रक्कम हस्तगत करुन नमुद महिलांना पुढील कारवाई कामी तुळजापूर पोलीसांचे ताब्यात दिले. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम- 128 अंतर्गत 10 व्यक्तींविरुध्द कारवाई करण्यात आल्या आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि- श्री. वासुदेव मोरे, सपोनि- श्री. सचिन खटके,अमोल मोरे, पोलीस हावलदार- विनोद जानराव, आश्विनकुमार जाधव, समाधान वाघमारे, फरहान पठाण, पोलीस नाईक- नितीन जाधवर, बबन जाधवर मपोह- शैला टेळे, मपोकॉ-रंजना होळकर, चालक पोकॉ-गुरव, दहीहंडे, बोईनवाड यांच्या पथकाने केली आहे.
Back to top button
error: Content is protected !!