लोहारा / धाराशिव : होळी ता.लोहारा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन दि.06.10.2024 रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विकासात्मक धोरणावर विश्वास ठेवून सरपंच पती ओम बिराजदार व उपसरपंच दत्ता चव्हाण यांच्यासह होळी येथील अनेक युवकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत केले. येणाऱ्या काळात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल व शिवसेना पक्ष संघटना बळकट कराल असा विश्वास व्यक्त केला. तसेच ग्रामीण भागातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि गावोगावी सक्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. ही मतदारसंघात आपण केलेल्या विकासकामांची पावती असून शहरासह ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला जनतेचा मिळणारा पाठिंबाच आहे. तसेच शिवसेनेत आलेल्या प्रत्येकाला सन्मानाची वागणूक मिळेल व विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्यांचाही मोलाचा सहभाग असेल असे मनोगत व्यक्त केला.
सरपंच पती ओम ईश्वर बिराजदार, उपसरपंच दत्ता पुनाजी चव्हाण, गोविंद श्रीमंत चव्हाण निखिल चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, प्रदीप चव्हाण, संदीप राठोड, आकाश राठोड, रोहित चव्हाण, शंकर चव्हाण, राहुल चव्हाण, अनिकेत राठोड, भरत चव्हाण, किसन चव्हाण, अंकुश चव्हाण, रोहित राठोड, भरत चव्हाण ,किरण चव्हाण, लहू चव्हाण, महेश चव्हाण, कबीर चव्हाण, अमोल राठोड, शरद पवार, भीमा चव्हाण, संतोष रमेश राठोड आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.
कार्यक्रमास लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, उपतालुकाप्रमुख व्यंकट पाटील, माजी जि.प.सदस्य शेखर घंटे, माजी पं.स.सदस्य बसवराज शिंदे, एकोंडी लो. बाबा सूर्यवंशी, उपसरपंच विकास पाटील, होळी माजी सरपंच व्यंकट माळी, काकासाहेब चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ जाधव, युवासेना उपतालुकाप्रमुख प्रदीप मोरे, संजय मनाळे, संतोष राठोड, भरत जाधव, समुद्राळ सरपंच हणमंत कोकाटे, माजी सरपंच तुकाराम जाधव, करण बाबळसुरे, विनोद मुसांडे, युवराज कोकाटे, नितीन पाटील हरी भोसले,आदी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.