महाराष्ट्र

लोकमंगलने एफआरपीपेक्षा 29 टक्के अधिकचे पैसे शेतकऱ्यांना दिले – अध्यक्ष श्री. महेश देशमुख

लोहारा / उमरगा : सोलापुर लोकमंगल शुगर्सच्या तीन कारखान्यांपैकी धाराशिव जिल्हयाच्या लोहारा येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रिज लिमिटेड या कारखान्याने 2023-24 च्या गळीत हंगामात 4 लाख 19 हजार 861 टन एवढे ऊस गाळप केले असुन शेतकऱ्यांना 114 कोटी 3 लाख एवढे ऊसाचे पेमेंट केले आहे. शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली ही रक्कम एफआरपी नुसार त्यांना देणे असलेल्या रकमेपेक्षा 25 कोटी 64 लाख रुपयांनी जास्त म्हणजे 29 टक्के अधिक आहे. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष श्री. महेश देशमुख यांनी दिली आहे.

लोहारा येथील या साखर कारखान्याने 2023-24 या गळीत हंगामात 4 लाख 19 हजार 861 टन एवढे विक्रमी ऊसाचे गाळप केले. शेतकऱ्यांना एफआरपी दर 2105 रुपये प्रति टन असा देय होता पण कारखान्याने सरासरी 2716 रुपये दर दिला. हा दर एफआरपी पेक्षा टनामागे 610 रुपयांनी जास्त होता. यातुन शेतकऱ्यांना एकुण 88 कोटी 39 लाख रुपये देणे सरकारी नियमानुसार अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात 114 कोटी 3 लाख रुपये देण्यात आले. ही जादा रक्कम 25 कोटी 64 लाख रुपयांनी जास्त्आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली ही रक्कम नियामानुसार देणे असलेल्या रकमेपेक्षा 29.01 टक्कयांनी जास्त आहे असे श्री. देशमुख यांनी सांगितले.

कारखान्याने काहींसे उशिराने ऊस बिल दिलेले आहे, परंतु आता 100% दिलेले आहे. आता सरकारने ऊस तोड कामगारांना त्यांच्या मजुरीत 34 टक्के वाढ मंजुर केली आहे. त्यांचे पेमेंट कारखाना लवकरच अदा करील असे देशमुख यांनी सांगितले. 2023-24 गळीत हंगामातले सगळे पेमेंट पुर्ण करुन कारखाना 2024- 25 चा गळीत हंगाम असाच विक्रमी गाळपाचा करण्यास सिध्द आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी जसे सहकार्य केले तसेच याही वर्षी करावे आणि तसे झाल्यास खात्रीने हाही हंगाम आपण यशस्वी करुन असे ते म्हणाले.

सध्या पाऊस चांगला पडला आहे आणि सर्वत्र त्याचा फायदा घेऊन एकरी 100 टन ऊस उत्पादन करण्याचा हुरुप शेतकऱ्यांत वाढत आहे. ऊसाची शेती आणि साखर कारखानदारी यांचे भवितव्य चांगले असल्याचे आशादायक वातावरण आहे. शेतकऱ्यांनी चांगले सहकार्य केले तर कारखाना प्रगतीपथावरच राहील आणि शेतकरीही चांगला भाव मिळुन सुस्थितीत राहतील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

यावेळी कारखान्याचे संचालक श्री. प्रशांत पाटील, श्री. पराग पाटील, वरिष्ट सरव्यवस्थापक श्री. छगन भोगाडे, सहा. सरव्यवस्थापक श्री. व्यंकटेश वाघोलीकर प्रशासकीय अधिकारी श्री. राजकुमार सगर, चिफ केमिस्ट श्री. नरेश रामपुरे, ऊस पुरवठा अधिकारी, श्री. पंडित चव्हाण विद्युत सहाय्यक गणेश मोरे,श्री. बिराजदार, केन अर्कोटेट श्री. शाम साळुंखे, प्रमुख लिपीक श्री. किरण पाटील इ. उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!