शैक्षणिक

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी

धाराशिव : आज दिनांक ०२/१०/२०२४ वार बुधवार रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती त्याचबरोबर स्वच्छता मोहीम स्प्रिंग डेल पब्लिक स्कूल मध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

 

HTML img Tag Simply Easy Learning

या शुभ दिनी शाळेत पालक सभा घेण्यात आली अशा प्रसंगी स्वच्छता मोहिमेची पालकांनी प्रतिज्ञा घेतली व स्वच्छता संदेशाचा जयघोष करीत प्रभात फेरी काढली. स्वच्छता मोहिमेत भाग घेत शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पालकांनी मंदिर परिसर, रस्ता, चौक परिसर सफाई केली.

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. नरसिंगजी आयलाने, सचिव श्री. विनोद जटाळ, कोषाध्यक्ष श्री अमोलजी आयलाने समन्वयक सौ. राजश्री आयलाने व शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर श्री. तेलंगे सर, श्री. खोत सर, श्रीमती फुलमंटे, श्रीमती वाघमारे, मिस उडगे, माता-पिता पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वाघमारे यांनी केले व आभार श्री खोत यांनी केले माता पिता पालक विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!