गोरसेनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जाहीर

धराशिव | प्रतिनिधी
आज दिनांक १४ डिसेंबर रोजी लातूर येथे गोरसीकवाडी या सामाजिक चळवळीच्या राष्ट्रीय चिंतन (समंळ) बैठकीत महाराष्ट्र राज्य गोरसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या बैठकीत सर्वानुमते पुढीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे —
- राज्य अध्यक्ष: दिलीप जाधव
- उपाध्यक्ष: विठ्ठल चव्हाण
- सचिव: विजय जाधव
- संघटक: बालाजी राठोड

या कार्यक्रमास गोरसीकवाडीचे राष्ट्रीय संयोजक मा. इंजि. आर. सी. चव्हाण तसेच गोरसाकवाडीचे लढाऊ नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे विजय भाऊ चव्हाण प्रमुख उपस्थित होते.

यावेळी कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र यांसह इतर राज्यांतील गोरसीकवाडी चळवळ व गोरसाना संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या. बैठकीत संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच सामाजिक न्याय, हक्क व संघटन बळकटीकरणावर भर देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
नवीन कार्यकारिणीमुळे गोरसेना व गोरसीकवाडी चळवळीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



