
लोहारा / प्रतिनिधी(जि.धाराशिव) : एकबाल मुल्ला
भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला यांचे चिरंजीव बिलाल मुल्ला यांनी कर्नाटक राज्यातून बी. फार्मसी (पदवी) परीक्षा उत्तीर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे लोहारा तालुक्यासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
बिलाल मुल्ला यांनी लहानपणापासून सीबीएसई अभ्यासक्रमांतर्गत शिक्षण घेतले असून, राजीव मेमोरियल एज्युकेशन सोसायटी ऑफ फार्मसी, गुलबर्गा (कलबुर्गी) येथून बी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, बेंगळुरू अंतर्गत कर्नाटक राज्य युनिटची बी. फार्मसी (पदवी) परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या मेहनतीचे फळ मिळवले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल भाजपाचे नेते व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, शिवसेना उपनेते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपा धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे व संताजी चालुक्य, भाजपाचे नेते अभय भैय्या चालुक्य, भाजपा युवा नेते शरण पाटील, उमरगा–लोहारा विधानसभा प्रमुख राहुल दादा पाटील, भाजपा युवा नेते हर्षवर्धन चालुक्य, जिल्हा मराठी पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, राजेंद्र माळी, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, मंडळ अधिकारी जगदीश लांडगे आदी मान्यवरांनी बिलाल मुल्ला यांचे अभिनंदन केले आहे.

बिलाल मुल्ला यांच्या यशामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच लोहारा तालुक्यातील नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



