क्राईम
“मोबाईल शॉपी फोडणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात ”

धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखा : फिर्यादी नामे-मोहन रामचंद्र बागडे, वय 41 वर्षे, रा. शिवाजी नगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांचे वेताळ रोड भुम येथील जय म्युझीकल ॲण्ड मोबाईल शॉपी नावाचे मोबाईलचे दुकानाचे शटरचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.18.11.2024 रोजी 09.00 ते दि. 19.11.2024 रोजी 02.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे टेक्नो एच.एम.डी. विवो, सॅमसंग झेड फोल्ड 6, वन प्लस 10 आर, रेडमी कंपनीचे एआर बडस, रेडमी कंपनीचे स्मार्ट वॉच असे एकुण 6,89,866₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मोहन बागडे यांनी दि.19.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे गुरनं 259/2024 कलम 331( 4),305 (अ) भा.न्या.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली कौशल्यपुर्ण तपास करुन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने कांही मोबाईल फोनचे लोकेशन धाराशिव, भुम, मोहा, ढोकी, माळकरंजा असे वेगवेगळ्या ठिकाणी येत असल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावून शोध घेतला. मोबाईल सिम चा धरक यास त्याच्या ताब्यात असलेल्या मोबाईल फोन बाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, मागील चार दिवसापुर्वी भिमा काळे रा. सांजा रोड धाराशिव याच्याकडून पावती नंतर देतो अशा अटीवर 5,000₹. ला विकत घेतला आहे असे सांगीतले. त्यानंतर संशईत सिम 9356364319 चे लोकेशन भुम येथे येत असल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावून तेथे एक महिला मिळून आली. तिस तिच्या ताब्यात असलेल्या मोबाईल बाबत विचारपुस केली असता तिने सांगितले की माझा मुलगा राजु अर्जुन काळे याने आणुन घरी ठेवला आहे.




