लोहारा, ( जि.धाराशिव ) :
सालेगाव येथील क्रांती परिसरात भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. त्याला युवक , महीला यांनी चांगला प्रतिसाद दिला. शनिवारी सकाळी १०:०० ते ५:०० वाजण्याच्या दरम्यान हे शिबिर संपन्न झाले.भारतीय बौद्ध महासभेच्या लोहारा तालुका शाखेच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष तानाजी माटे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्षा राजश्री कदम व युगप्रवर्तक चैत्य चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजयकुमार भालेराव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.यावेळी जिल्हा , जिल्हा संरक्षण सचिव विजयकुमार बनसोडेसंरक्षण उपाध्यक्ष अनिल सरतापे, संस्कार सचिव रत्नदिप मस्के, महीला सचिव केराबाई गायकवाड,जिल्हा संघटक प्रा. सुधाकर गायकवाड, ब्रम्हानंद गायकवाड, तालुका सरचिटणीस दिपक सोनकांबळे, कोषाध्यक्ष डॉ. प्रा. विनोद आचार्य, संस्कार उपाध्यक्ष बाळासाहेब खरोसे, संरक्षण उपाध्यक्ष प्रशांत भंडारे,सचिव मंगल कांबळे, पर्यटन उपाध्यक्षा आम्रपाली गोतसुर्वे, स्वप्निल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे येथील मेजर अनिल कांबळे यांनी प्रशिक्षणार्थींना कवायत, स्व संरक्षणाचे धडे दिले. भारतीय बौद्ध महासभेचा इतिहास,समता सैनिक दलाचे समाजासाठी योगदान याविषयी माहीती देण्यात आले.
यावेळी अण्णाराव भालेराव,रूक्मीबाई सोनवणे, सिताताई सोनवणे, जानकाबाई मस्के, वत्सलाबाई गायकवाड, शांताबाई भालेराव,भोसगा लिस्ट पंकज सोनकांबळे, गोरख गायकवाड, विनायक गायकवाड, रोहित गायकवाड, सिद्धार्थ सोनकांबळे, निशा सोनकांबळे, प्रतीक्षा सोनकांबळे, लिस्ट प्रमोद डोंबे, भागवत मुखे ,पृथ्वीराज मुखे, मनोज मुखे ,स्वप्नील मुखे, कुणाल मुखे, सिद्धांत मुखे, सचिन सोनकांबळे, दत्त मुखे, यांच्यासह कदेर, सालेगाव, आष्टा कासार, भोसगा,जेवळी, कास्ती ,नागूर, नागराळ लो. येथील युवक महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिलाबाई कांबळे, अंजनाबाई भालेराव,सज्ञान भालेराव,शोभा भालेराव, केवळबाई गायकवाड, लक्ष्मीबाई भालेराव,अनिता धनेराव, मथुराबाई भालेराव,मीना भालेराव यांच्यासह समता सैनिक यांनी पुढाकार घेतला.