लोहारा ( जि.धाराशिव ) : जुने मित्र त्यांच्या सोबत शिकत असताना घडलेले गमतीदार किस्से, शिक्षण घेत असताना काढलेल्या एकमेकांच्या खोड्या, झालेली भांडणे रुसवे, फुगवे या साऱ्या आठवणीत “ते” रमले कारण होते श्री शांतेश्वर विद्यालय सास्तूरच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मेळाव्याचे तब्बल 20 वर्षांनी सर्व वर्ग मित्र परत एकाच मंचावर आले होते.
आजच्या धावपळीच्या जीवनातून 2003-2004 बॅचच्या काही विद्यार्थ्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करून स्नेह मेळावा कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते.
शाळेच्या इमारतीत माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या आध्यक्ष्यस्थानी श्री. कुमार पाटिल सर तर प्रमुख पाहुणे म्हणुन सास्तूर गावच्या सरपंच सौ. शितलताई पाटिल, तसेच सर्व आजी माजी शिक्षक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अध्यक्ष व सर्व आजी आणि माजी शिक्षकवर्ग तसेच प्रमुख पाहुणे ह्यांचे माजी विद्यार्थ्यांनी शाल ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान केला. बरेच विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत, आजही त्यांना आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या शाळेचा विसर पडला नाही हे विशेष. या सुंदर कार्यक्रमासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.