
लोहारा : तालुक्यातील जिल्हा परिषद कानेगाव गटात पार पडलेल्या मतदानात मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. एकूण १३ हजार ७५३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत व सुरळीतरीत्या मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.
गावनिहाय मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे — आरणी ५९५, कानेगाव येथे सर्वाधिक २८२२, भातागळी १४८९, नागूर १३२६, कास्ती (बु.) ७०३, कास्ती (खु.) १०१९, लोहारा ६४३, मार्डी ८७६, नागराळ ४३८, शिवकरवाडी १८१, हिप्परगा १३६९, मोघा (बु.) ३६१, मोघा (खु.) ३७६, बेलवाडी ३९८, उंडरगाव ७८९ व बेंडकाळ ३६८ अशी नोंद झाली आहे.
सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली. महिला व युवकांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. निवडणूक प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याने कोणतीही अनुचित घटना न घडता मतदान शांततेत पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.



