राजकीय
प्रहार जनशक्ती पक्षाच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी ढोणे

लोहारा / उमरगा : लोहारा तालुक्यातील माकणी येथील वामन वसंत ढोणे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
परिवर्तन महाशक्ती चे उमेदवार सातलिंग स्वामी व प्रहार जनशक्ती पक्षा चे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड यांचा हस्ते वामन वसंत ढोणे यांना लोहारा तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र स्वराज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश गोरे, तालुकाध्यक्ष रामेश्वर कार्ले,प्रशांत थोरात आदी उपस्थित होते.