महाराष्ट्र
चिमुकल्यांनी अलगदपणे रूढी परंपरेला मागे सारत वैज्ञानिक दृष्टीकोणास कवठाळून शैक्षणिक साहित्यांची केली पूजा…
लोहारा: तावशी गड, तालुका लोहारा. येथील सातवी मध्ये शिकणारा अभिनव गायकवाड व चौथीमध्ये शिकणारी आरोही गायकवाड या भावंडांनी विज्ञानवादी संदेश देत. आजच्या दिवसाचे वेगळेच महत्व आपल्या देशातील चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार “बळीराजा” ज्या शस्त्रांच्या आधारे वर्षभर आपल्याला सांभाळतो ,त्या त्याच्या शेती अवजारांची पूजा असतो.जो व्यक्ती व्यवसाय ,करतो तो व्यक्ती त्याच्या व्यवसायाशी निगडित शस्त्रांची, अवजारांची पूजा करतो. परंतु या दोन चिमुकल्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून भारतरत्न, मिसाइलमॅन, थोर शास्त्रज्ञ तथा राष्ट्राचे राष्ट्रपती, डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम .यांच्या विचाराशी व विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, यांच्या “विज्ञानवादी” विचाराला प्रेरित असलेल्या साहित्याची पूजापाठ मांडून त्यांच्या या स्वकल्पनेतून आणि बुद्धीच्या जोरावर रुचलेले विचारातून मागील विचार धारा म्हणजेच रूढी परंपरा ,अंधश्रद्धा, भावनिक पूजा पाठ, अशा पारंपारिक, विषयास अलगदपणे बगल देऊन आपल्याच घरामध्ये चक्क शिक्षणाचे शस्त्रे, व साहित्यांची पूजा मांडली . या पूजेमध्ये त्याने ठेवलेले शस्त्र म्हणजेच कॉम्प्युटर लेखणी, थोर पुरुषांचे पुस्तके, वही, देशातील गाजलेले वृत्तपत्रे,अभ्यासाच्या जोरावर मिळवलेले सन्मान चिन्हे, अनेक सुवर्णपदके, बुद्धिबळ ,योग साधना, डिक्शनरी, टेनिस बॉल, शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांचे “मिसाइल , व अशा अनेक शिक्षणासी निगडित असलेल्या वस्तूंचे पूजन करून समाजालाच नव्हे तर .सर्व मानवाला एक आदर्श पूजा पाठ याचे बोलके छायाचित्र त्यांनी त्यांच्या या शस्त्रांच्या पूजापाठातून दाखवून दिली .व पुढील भावी पिढीला” विज्ञान हेच वरदान “असल्याचा मौल्यवान संदेश या दिनी दिला……!