लोहारा / उमरगा : लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळा व श्री.शांतेश्र्वर दिव्यांग कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र,सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून शालेय शिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्य महत्वकांक्षी “स्वच्छता पंधरवडा” या उपक्रमांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे व व्यवस्थापकीय अधिक्षक भरत बालवाड यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.रॅलीत सहभागी विद्यार्थी व कर्मचारी यांच्या वतीने स्वच्छतेच्या घोषणा देत सास्तूर नगरीच्या मुख्य रस्त्यावरून पुढे जात छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग आयोजित स्वच्छता पथनाट्य प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादरिकरणातून उपस्थितांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.यावेळी सास्तुर नगरीच्या सरपंच शितलताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य बालाजी कांबळे, गोविंद यादव,पाणी पुरवठा सभापती उत्तम क्षीरसागर,माजी तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बारकुले,सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आंबेकर,आकाश कांबळे इ.मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थितांना मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांनी स्वच्छता शपथ दिली.
त्यानंतर रॅली घोषणा देत पुढे जात नगरीतील भारतमाता मंदिर येथील परिसराची स्वच्छता विद्यार्थी,कर्मचारी, व मान्यवर मंडळीच्या वतीने करून भारतमातेचे पूजन करून वंदन करण्यात आले.तेथून रॅली स्वच्छतेच्या घोषणा देत रस्त्याने पुढे जात शेवटी प्रशालेत रॅलीची सहभागी सर्वांचे आभार व्यक्त करून सांगता झाली. त्यानंतर प्रशालेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे हे होते.तर प्रमुख अतिथी व्यवस्थापकीय अधिक्षक भरत बालवाड,ज्येष्ठ शिक्षक अनंत कुकाले त्याचबरोबर प्रशालेतील व प्रशिक्षण केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित सर्व मान्यवरांचे व सर्व उस्थितांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवन कार्य,व भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील योगदानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या माध्यमातून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर विद्यार्थ्यांच्या कला महोत्सव स्पर्धा 2024 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र,(डाएट)धाराशिव येथे दि.30 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.सदरील स्पर्धेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक समूह नृत्य स्पर्धेत संघ सहभागी झाले होते.
प्रशालेचा संघ मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रवीण वाघमोडे, साह्यक शंकरबाबा गिरी,निशांत सावंत,संजय शिंदे,सुनीता कज्जेवाड प्रयाग पवळे समवेत प्रशालेतील प्रवेशित दिव्यांग विद्यार्थी भाग्येश इस्लामपूरे,रितेश देशमुख,महेश पवार,भाग्यश्री कांबळे ,संध्याराणी कदम इ.सहभागी विद्यार्थी संघ लोहारा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बहारदार आदिवासी समूह नृत्य सादर करत सर्वसामान्य विद्यार्थी संघाला पराभूत करीत सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. विभाग प्रमुख प्रवीण वाघमोडे व त्यांच्यासमवेत असलेले सर्व सहाय्यक कर्मचारी व विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रशालेच्या वतीने कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल शेळगे यांनी केले.तर आभार प्रविण वाघमोडे यांनी मानले.
Back to top button
error: Content is protected !!